Monday, February 8, 2010

अजुन काही दिवस

अजुन काही दिवस काढायचे, संपेल लवकरच जीवाची होणारी घालमेल.
नको असलेल्या जवाबदरीसारखे संभाळायाचे , आपले हृदय , आपले विचार, आपली तत्वे आणि आपली आशा , अजुन काही दिवस.
काही दिवसानंतर ह्यातल काहीच नसणार, मी.. "मी नसणार" , "माझ्यातला माणूस नसणार". माणूस म्हणून जगायचे अजुन काही दिवस. संवेदना,भावना,अस्तित्व,विश्वास,प्रेम अशा शब्दांचा संबंध नसणार , चाहूल नसणार.
फक्त अजुन काही दिवस,सगळ काही साक्षी बनून बघायच. आपल्यातल्या माणसाला रोज सरणावर जाताना हसत हसत बघायच,अजुन काही दिवस.
खरच बरे होईल, किती हलके हलके वाटेल आणि वाटायालाच हव. माणूस म्हणून जगण्याचे ओझ कमी होणार. आयुष्यभर जोपासून ठेवलेल्या मूल्यांच ओझ कमी होणार.
हलक होऊन, पक्षी बनून माझ्या आभाळात उडायच, उंच उंच. होय माझ आभाळ. तुमच-आमच वाटणार चंद्र,तारे नक्षत्र असणार आभाळ तुमचे.. फक्त तुमचे.
माझ आभाळ वेगळ, फक्त माझ्यासाठी..
-----विपुल

No comments: