Thursday, February 11, 2010

४५ मिनिटे

सोमवार ते शुक्रवार माझ्या आयुष्यात ही ४५ मिनिटे विषेशरित्या अनुभवतो. खरच वेगळी अशी माझी ४५ मिनिटे...
ओफीसात दिवसभर काम करून संध्याकाळी ( बहुतांश वेळा रात्री) नशिबात येतात ही ४५ मिनिटे.
ओफीसातून बाहेर पडल्यावर, गाडी सुरू केल्यापासून चालू होतात ही ४५ मिनिटे आणि संपतात ती घराच्या पार्किंगमधे आल्यावर.
प्रत्येक वेळेस कहीना काही घडत असते ह्या ४५ मिनिटात, रोज ह्या ४५ मिनिटांमधे जगत असतो, तर कधी कधी तीळ तीळ मरत पण असतो. स्वत:च एक वेगळच विश्व असते ह्या वेळेत.
गाडी चालवणारा मी.."मी नसतो". गाडी बुद्धी चालवत असते,शरीराला वेळोवेळी सूचना करत असते. मी मात्र असतो माझ्या विश्वात, कधी कधी बुद्धी त्यात डोकावण्याचा प्रयत्न करत असते पण तिलाच त्रास होतो. कधी गाडीने नेहमीचा रस्ता चुकवलेला असतो, तर कधी सिग्नल तोडलेला असतो, तर कधी कोणाला धडक मारता मारत राहिलेली असते. बिचारी बुद्धी.. असो.
माझ आणि बुद्धी कधी पटलेच नाही. बुद्धी नसते तर.. जाउदे विषय भरकत चाललाय मूळ मुदयवर येतो.
खरच यार, ह्या ४५ मिनिटात जो एकांत मिळतो ना तो काही वेगळाच. स्वत:च्या खोलीत मिळणारा एकांत आणि गाडी चालवताना गर्दी मधे मिळणारा एकांत जाम फरक आहे.
सुसाट वेगाने गाडी चालवताना कानामधे घुसनार्‍या वार्‍या चा नाद एकत. चंद्राकडे बघत विचारांची जी मैफिल भरते.. काय सांगू.. खरच देवाकडे जीवनात ही वेळ अशीच राहुदे असे मागने घालावेसे वाटते. मजला शब्द नाही आहेत व्यक्त करायला. काही गोष्टी शब्दात नाही मांडता येत. एका अर्थाने हेच बरे, काही अनुभव अव्यक्त असलेलेच बरे.
कधी कधी वाटते ही ४५ मिनिटे संपुच नये. आयुष्य येथेच स्तब्ध व्हाव. मी तरी काय करू.. माणूस आहेना,जरा तरी लोभ असतो. त्याला मी अपवाद कसा, लोभ असावा पण भौतिक गोष्टींचा नसावा..
शेवटी नशिबाने थट्टा केलीच , हीच ४५ मिनिटे नको नको केली. नको ही वेदनादायक ४५ मिनिटे. नको हे विश्व..नको हे विचार.. कधी संपते ही वेळ. घराची ओढ लागते. गाडीचा वेग ओपोआप वाढला जातो. जीव थकून जातो ह्या ४५ मिनिटांमधे.. एकांत खायला उठतो. आपलच विश्व वेदना देत असते. या विश्वात एवढ गुरफुटून जातो की जीव गुदमारतो तो श्वास घेऊन. आपल्याच जगात श्वास घेणे पण गुन्हा होतो आणि नाइलाजाने पुन्हा पुन्हा करावा लागतो आणि शिक्षा मिळते श्वास घेतच राहणे ४५ मिनिट संपेपर्यंत.
-----विपुल

No comments: