Wednesday, July 7, 2010

तु या

तु...तु या बेफ़ाम वार्‍यात...
तु...तु या रिमझिम सरितं...
तु...तु या शुभ्र धुक्यातं...
तु...तु या सुंदर फ़ुलातं..
तु...तु या खळखळणार्‍या पाण्यातं...
तु...तु या टपोर्या दवबिंदूतं..
तु...तु या बेधुंद कोसळणार्‍या जलधारेत...
तु...तु या दाटलेल्या मेघात...
तु...तु या प्रफ़्फ़ुलित आसंमंतात..
तु...तु या माझ्या ह्रुदयात गं...
-------विपुल

Tuesday, April 27, 2010

मी न माझा राहिलो


मी न माझा राहिलो
माझे न कोणी...
मतलबी या जगतात
आता उरले न काही... ॥ध्रु॥


माणुस म्हणुनी जन्मलो
माणुस म्हणुनी जगलो
व्यवहारी या बाजारात
सौदा न केला कधी... ॥१॥

घालुनि मुखवटे इथे
बेइमान फ़िरती भोवताली
गर्दीत या बघ्यांच्या
जीव गुदमरुन जाई... ॥२॥

आखुनी चौकट इथे
झेप घेतात सारे
झाटूनी पंख स्वप्नांचे
मग्रूर हसतात प्यारे... ॥३॥

या देशात गलबतांच्या
राहिले न किनारे
अनूकुल जेथे वारे
धावले तेथे न्यारे...॥४॥

मी न माझा राहिलो
माझे न कोणी...
मतलबी या जगतात
आता उरले न काही... ॥ध्रु॥

-------विपुल

Monday, February 15, 2010

दोष ना कुणाचा...


दोष ना कुणाचा...
ना तुझ्या मनाचा, ना माझ्या मनाचा
ना तुझ्या नजरेचा, ना माझ्या लोचनांचा
ना तुझ्या हास्याचा, ना माझ्या स्पंदनांचा
ना तुझ्या पाउलांचा, ना माझ्या जीवन वाटेचा
ना तुझ्या स्पर्शाचा, ना माझ्या थरथरण्याचा
ना तुझ्या आठवनींचा, ना माझ्या आसवांचा
ना तुझ्या जाण्याचा, ना माझ्या वाट पाहण्याचा
दोष ना कुणाचा...
ना तुझ्या मनाचा, ना माझ्या मनाचा
-----विपुल

Thursday, February 11, 2010

४५ मिनिटे

सोमवार ते शुक्रवार माझ्या आयुष्यात ही ४५ मिनिटे विषेशरित्या अनुभवतो. खरच वेगळी अशी माझी ४५ मिनिटे...
ओफीसात दिवसभर काम करून संध्याकाळी ( बहुतांश वेळा रात्री) नशिबात येतात ही ४५ मिनिटे.
ओफीसातून बाहेर पडल्यावर, गाडी सुरू केल्यापासून चालू होतात ही ४५ मिनिटे आणि संपतात ती घराच्या पार्किंगमधे आल्यावर.
प्रत्येक वेळेस कहीना काही घडत असते ह्या ४५ मिनिटात, रोज ह्या ४५ मिनिटांमधे जगत असतो, तर कधी कधी तीळ तीळ मरत पण असतो. स्वत:च एक वेगळच विश्व असते ह्या वेळेत.
गाडी चालवणारा मी.."मी नसतो". गाडी बुद्धी चालवत असते,शरीराला वेळोवेळी सूचना करत असते. मी मात्र असतो माझ्या विश्वात, कधी कधी बुद्धी त्यात डोकावण्याचा प्रयत्न करत असते पण तिलाच त्रास होतो. कधी गाडीने नेहमीचा रस्ता चुकवलेला असतो, तर कधी सिग्नल तोडलेला असतो, तर कधी कोणाला धडक मारता मारत राहिलेली असते. बिचारी बुद्धी.. असो.
माझ आणि बुद्धी कधी पटलेच नाही. बुद्धी नसते तर.. जाउदे विषय भरकत चाललाय मूळ मुदयवर येतो.
खरच यार, ह्या ४५ मिनिटात जो एकांत मिळतो ना तो काही वेगळाच. स्वत:च्या खोलीत मिळणारा एकांत आणि गाडी चालवताना गर्दी मधे मिळणारा एकांत जाम फरक आहे.
सुसाट वेगाने गाडी चालवताना कानामधे घुसनार्‍या वार्‍या चा नाद एकत. चंद्राकडे बघत विचारांची जी मैफिल भरते.. काय सांगू.. खरच देवाकडे जीवनात ही वेळ अशीच राहुदे असे मागने घालावेसे वाटते. मजला शब्द नाही आहेत व्यक्त करायला. काही गोष्टी शब्दात नाही मांडता येत. एका अर्थाने हेच बरे, काही अनुभव अव्यक्त असलेलेच बरे.
कधी कधी वाटते ही ४५ मिनिटे संपुच नये. आयुष्य येथेच स्तब्ध व्हाव. मी तरी काय करू.. माणूस आहेना,जरा तरी लोभ असतो. त्याला मी अपवाद कसा, लोभ असावा पण भौतिक गोष्टींचा नसावा..
शेवटी नशिबाने थट्टा केलीच , हीच ४५ मिनिटे नको नको केली. नको ही वेदनादायक ४५ मिनिटे. नको हे विश्व..नको हे विचार.. कधी संपते ही वेळ. घराची ओढ लागते. गाडीचा वेग ओपोआप वाढला जातो. जीव थकून जातो ह्या ४५ मिनिटांमधे.. एकांत खायला उठतो. आपलच विश्व वेदना देत असते. या विश्वात एवढ गुरफुटून जातो की जीव गुदमारतो तो श्वास घेऊन. आपल्याच जगात श्वास घेणे पण गुन्हा होतो आणि नाइलाजाने पुन्हा पुन्हा करावा लागतो आणि शिक्षा मिळते श्वास घेतच राहणे ४५ मिनिट संपेपर्यंत.
-----विपुल

Monday, February 8, 2010

अजुन काही दिवस

अजुन काही दिवस काढायचे, संपेल लवकरच जीवाची होणारी घालमेल.
नको असलेल्या जवाबदरीसारखे संभाळायाचे , आपले हृदय , आपले विचार, आपली तत्वे आणि आपली आशा , अजुन काही दिवस.
काही दिवसानंतर ह्यातल काहीच नसणार, मी.. "मी नसणार" , "माझ्यातला माणूस नसणार". माणूस म्हणून जगायचे अजुन काही दिवस. संवेदना,भावना,अस्तित्व,विश्वास,प्रेम अशा शब्दांचा संबंध नसणार , चाहूल नसणार.
फक्त अजुन काही दिवस,सगळ काही साक्षी बनून बघायच. आपल्यातल्या माणसाला रोज सरणावर जाताना हसत हसत बघायच,अजुन काही दिवस.
खरच बरे होईल, किती हलके हलके वाटेल आणि वाटायालाच हव. माणूस म्हणून जगण्याचे ओझ कमी होणार. आयुष्यभर जोपासून ठेवलेल्या मूल्यांच ओझ कमी होणार.
हलक होऊन, पक्षी बनून माझ्या आभाळात उडायच, उंच उंच. होय माझ आभाळ. तुमच-आमच वाटणार चंद्र,तारे नक्षत्र असणार आभाळ तुमचे.. फक्त तुमचे.
माझ आभाळ वेगळ, फक्त माझ्यासाठी..
-----विपुल

Thursday, February 4, 2010

थकलोय ...

लोकांच्या स्वार्थाला बघून थकलोय
देवाला जाब मागून थकलोय

चौकटीतले आयुष्य जगून थकलोय
खोट खोट हसुन थकलोय

पाठमोरी सुखे बघून थकलोय
वेदेनाला कवटाळून थकलोय

दिशाहीन वाटेवर चालून थकलोय
उन्हात सावलीचा पाठलाग करून थकलोय

होकारची वाट बघून थकलोय
नकारातल्या रीतेपणाला थकलोय

स्वप्नांना तुटताना बघून थकलोय
आसवांना पापण्यांशी थोपवून थकलोय

निरअर्थक श्वास घेऊन थकलोय
पंचतत्वात समर्पीत व्हायची वाट बघून थकलोय.
------- विपुल.

Tuesday, February 2, 2010

माणूस

एकटेच आलो, एकटेच जायचे.
ना कोणासाठी थांबायाचे.
श्वास घेत राहायचे, दिवस ढकलत जायचे,
पुन्हा ना कधी माणूस व्हायचे...
हे पाप पुढच्या जन्मात न करायचे
---विपुल

Thursday, January 21, 2010

अशीच तू - तशीच तू

अशीच तू
तशीच तू

हर्ष तू
स्मित तू

चंद्र तू
नक्षत्र तू

शिंप तू
मोती तू

फूल तू
गंध तू

हृदय तू
स्पंदन तू

शब्द तू
काव्य तू

गीत तू
संगीत तू

स्पर्श तू
संवेदना तू

आशा तू
आकांशा तू

आभास तू
अस्तित्व तू

प्राण तू
श्वास तू

अशीच तू
तशीच तू
---विपुल