Thursday, November 5, 2009

अधांतरी....

आयुष्याच्या चित्रपटाला रीवाइंड बटन असते तर किती बरे झाले असते.ज्या गोष्टी चुकल्या त्यांचे पुन्हा रीटेक द्यायचे आणि सगळे कसे व्यवस्थित करायचे.
होईल का असे.....
पुन्हा मागे जाउन तिला सांगायचे मी तुझ्यावर जिवापाड प्रेम करतो.. खरच ह्या गोष्टी तेव्हाच रीयलाइज़्ड झाल्या असत्या तर किती बरे झाले असते.
पण त्या शिवाय प्रेम म्हणजे काय असते हे ही कळले नसते. मानवी स्वभाव पण त्याला कारणीभूत आहे.
एखादी गोष्ट नसल्यावर आपल्याला तिचे महत्व कळते.कित्येक दिवस बंद असलेले दार नकळत कोणी उघडतेआणि त्याची जाणीव होते ती व्यक्ती दूर गेल्यावर… खरच अजब, पण सत्य आहे.
विरह काय असतो आणि आपण खरच कोणावर ईतके प्रेम करतो हे जाणून घेण्यात पण एक वेगळीच नशा असते. किंबहुना आपल्याला माहीत पण नसते आपले हे निष्ठूर मन कोणावर प्रेम करू शकते.कोणीतरी म्हटले आहे प्रत्येक गोष्ट आयुष्यात पहिल्यांदाच होते.पण दोष नक्की कुणाचा ? वेड्या मनाचा, ज्याला प्रेम ह्यालाच म्हणतात हेच माहीत नव्हते, कि बुद्धीचा,ज्याला आपल्या भावना म्हणजे एक भ्रम आहे. "प्रेम" असे काही नसते,असे म्हणून वेड्या मनाला दडपून टाकणारी.
ह्या प्रश्नाचे उत्तर अजुन सुद्धा उनुत्तरित... मनबुद्धीच्या द्वन्द्वामध्ये "मी" मात्र राहतो अधांतरी....शेवटी दोष कोणाचाही असो त्रास "मी“ ला सहन करावा लागतो . भ्रमनिरास झालेल्या बुद्धीला पटते की मन खरे बोलत होते..हेच प्रेम आहे...पण जरी बुद्धीला आणि मनाला पटले तरी दैव थोडी बदलणार आहे. गेलीली वेळ थोडीच येणार आहे... आत्ता "मी“ ने काय करायचे ? पुन्हा तेच रीवाइंड बटन वगैरे वगैरे म्हणून स्वतःची समजूत घालायची आणि गपगुमान पडायच.
---विपुल

Wednesday, September 16, 2009

च्या मारी काहीतरी ईशेष हाय

आज कालच्याला काय व्हतय कळतच नाय
निसतीच कुस बदलत हाय
च्या मारी काहीतरी ईशेष हाय ||

कामात ध्यान नाय,
आन् पोटा-पाणीची सुद नाय
च्या मारी काहीतरी ईशेष हाय ||

बा बोलला दिवट्याच टाळक ठिकाणावर नाय
माय म्हणाली काहीतरी भानगड हाय
च्या मारी काहीतरी ईशेष हाय ||


चान्दुबा बघून काहीतरी व्हत हाय
पावसात मन थुई थुई नाचत हाय
च्या मारी काहीतरी ईशेष हाय ||

आय चान खर सांगू काय
तिच्या याद बिगर राहवतच नाय
जळि स्थळी काष्टी पाषाणि तीच ती हाय
च्या मारी काहीतरी ईशेष हाय ||

----विपुल

Monday, September 7, 2009

तू.........

तू एक सुंदर चाफेकळी
तुला पाहता पडते खळी || १ ||

तू एक सुंदर नाजूक परी
जीव जडला तुझ्यावरी || २||

तू एक सुंदर फुलपाखरू
भोवती तुझ्या मन बावरू ||३||

तू एक रिमझिम रेशीम धारा
आसमन्त सजला सारा ||४||

तू एक सुरेल सुमधुर गाणे
मनात बहरती प्रीतीचे चांदणे ||५||

प्रीतीच्या चांदण्यात चल न्हाऊ या
मनातले गुज बोलु या ||६||

----------विपुल

Friday, July 3, 2009

प्रेमाची SDLC

काय करू आजकाल कामात नाही ध्यान,
तिच्या विचाराने होते सिस्टम हॅंग

करत आहे देवाकाडे F1-F1,
आहे ती माझ्यासाठी A1-A1

तिच्या आठवणीने होते मेमरी full,
throw होते Exception stack is full

Divide by zero ची नाही मला भीती,
तिच्यावर माझ्या प्रेमाची गणती infinity

होत आहे स्वप्नाचे Design & Planning,
करीत आहे तसे जीवनाचे Scheduling

नाही होत जीवांचे "समाज"-casting ,
प्रेमात सगळे असते type-casting.

- विपुल.

Wednesday, July 1, 2009

साथ मला तुझी हवी !!

साथ मला तुझी हवी,
पाउसात चिंब भिजताना ,

साथ मला तुझी हवी,
आकाशात पांघरलेले चांदणे बघताना,

साथ मला तुझी हवी,
समुद्रकिनारी स्वप्नातले घरटे बांधताना,

साथ मला तुझी हवी,
बागेतील एका रम्य सायंकाळी मनसोक्त फिरताना,

साथ मला तुझी हवी,
गोठणार्‍या थंडीत प्रेमाची उब घेताना,

साथ मला तुझी हवी,
आयुष्याच्या रंगमंचावर एकेक पदर हळुच पलटताना,


साथ मला तुझी हवी,
जगास सामोरे जाताना,

साथ मला तुझी हवी,
जीवन आनंद लुटताना,

साथ मला तुझी हवी,
प्रत्येक श्वास घेताना....

विपुल.

Tuesday, June 23, 2009

हा चंद्र तुझ्यासाठी / Ha Chandra Tujhyasathi

स्वप्निल बांदोडकरचे गीतं

हा चंद्र तुझ्यासाठी
ही रात तुझ्यासाठी
आरास ही ता-यांची
गगनात तुझ्यासाठी... २

कैफ़ात अश्यावेळी
मज याद तुझी आली
ये नाआआआआआआआआआआ
मोहरत्या स्वप्नांना घेवुन ये तु
थरथरत्या स्पर्शांना घेवुन ये तु
अनुरागी रसरंगी होवुन ये तु
नाजुकशी एक परी होवुन ये तु

वर्षाव तुझ्या तारुण्याचा
रिमझिमता माझ्यावरी होवु दे
रेशिम तुझ्या लावण्याचे
चंदेरी माझ्यावरी लहरु दे
नाव तुझे माझ्या ओठी येते
फ़ुल जसे ही खुलताना दरवळते

इतके मज कळते अधुरा मी इथे
चांद रात ही बघ निसटुन जाते

बांधिन गगनास झुला
जर देशील साथ मला
ये नाआआआआआआआआआआ
मोहरत्या स्वप्नांना घेवुन ये तु
थरथरत्या स्पर्शांना घेवुन ये तु
अनुरागी रसरंगी होवुन ये तु
नाजुकशी एक परी होवुन ये तु

हे क्षण हळवे एकांताचे
दाटलेले माझ्या किती भोवताली
चाहुल तुझी घेण्यासाठी
रात्र झाली आहे म ऊ मखमाली
आज तुला सारे काही सांगावे
बिलगुनिया तु मज मजला ते ऐकावे

होवुन कारंजे उसळे मन माझे
पाऊल का अजुनही ना तुझे वाजे
जीव माझ व्याकुळला दे आत हाक मला
ये नाआआआआआआआआआआ
मोहरत्या स्वप्नांना घेवुन ये तु
थरथरत्या स्पर्शांना घेवुन ये तु
अनुरागी रसरंगी होवुन ये तु
नाजुकशी एक परी होवुन ये तु

Wednesday, April 29, 2009

स्वप्नात आली एक परी



स्वप्नात आली एक परी ,
होती ती तेजोमय गौरांगीनी

होती ती कमलनयनी तेजस्विनी,
अवकाशातल्या चांदणी सारखी

केस होते तिचे रेशमी ,
गुंफलेले त्यात माणिक-मोती


ओठ होते तिचे गुलाबी ,
करीत होते ते मधुर वाणी


हसताना पडे गालावर खळी,
हळूच उमलते एक सुंदर कळी


स्वप्नात आली एक परी,
आहे ती माझी प्राणेश्वरी
- विपुल

Tuesday, April 21, 2009

आठवण

भावनाना कवितेचे वळण येते,
शब्दाना देखील काव्य सुचते,

आठवणीत एकच ओढ असते,
तुझ्या सहवासाची निरंतर आस लागते,

क्षणाणा दिवसाचे महत्व येते,
तुझ्या एका नजरेसाठी मन सतत सलते ,

चहूकडे तुझेच रूप दिसते,
मन मनाचीच समजूत घालते,

तुझ्या सोन्दर्याचि तुलना होते,
नक्षत्र फिके वाटू लागते,

दूरवर असलेली तू...,
हृदयाने कायम जवळ असते...

--- विपुल

Friday, April 17, 2009

आम्ही पोर ....

आम्ही पोर आहोत मनाने साफ ,

नका लावू आम्हाला उगाचाच फास,

आम्ही पोर नाही इतके वाईट,

आमची हालत नेहमी असते टाइट ,

आम्ही पोर टाकतो बोलबच्चन,

दिलेला शब्द मानतो वचन,

आम्ही पोर आहोत विश्वासपात्र,

नका करू आम्हास प्रेमास अपात्र,

आम्ही पोर नाही कधी अश्रू ढाळत,

नका म्हणू आम्हाला भावनांचा अर्थ नाही कळत ,

आम्ही पोर आहोत टवाळ,

प्रेम करून तर बघा आमच्या सारखे आम्हीच मवाळ...

- विपुल

Friday, January 9, 2009

प्रेम म्हणजे काय असते

प्रेम म्हणजे काय असते,
जात , धर्म , पंथ, भाषा सर्व काही एक असते,

प्रेम म्हणजे काय असते,
श्रीमंत , गरीब कोणी नसते , मन फक्त सुंदर असते,

प्रेम म्हणजे काय असते,
तुझे-माझे काही नसते , सर्वकाही आपले असते,

प्रेम म्हणजे काय असते,
शब्द माझे , भावविश्व मात्र तिचे असते,

प्रेम म्हणजे काय असते,
दुख माझे , सुख मात्र तिचे असते ,

प्रेम म्हणजे काय असते,
हृदयात मात्र तीच असते ,

प्रेम म्हणजे काय असते,
तिच्या आठवणीत मन सतत झुरत असते ,

प्रेम म्हणजे काय असते,
देह दोन ज्योत मात्र एक असते

-विपुल

Thursday, January 8, 2009

स्वप्नात माझ्या येशील का

स्वप्नात माझ्या येशील का
जीवनाची साथ देशील का

स्वप्नात माझ्या येशील का
प्रेमाचे गीत गाशील का

स्वप्नात माझ्या येशील का
हळूवार मिठीत घेशील का

स्वप्नात माझ्या येशील का
रंगात माझ्या रंगशील का

स्वप्नात माझ्या येशील का
नजरेने तुझ्या घायाळ मला करशील का

स्वप्नात माझ्या येशील का
गीत माझे होशील का

स्वप्नात माझ्या येशील का
क्षणभर प्रेम करशील का
- विपुल