Monday, February 8, 2010

अजुन काही दिवस

अजुन काही दिवस काढायचे, संपेल लवकरच जीवाची होणारी घालमेल.
नको असलेल्या जवाबदरीसारखे संभाळायाचे , आपले हृदय , आपले विचार, आपली तत्वे आणि आपली आशा , अजुन काही दिवस.
काही दिवसानंतर ह्यातल काहीच नसणार, मी.. "मी नसणार" , "माझ्यातला माणूस नसणार". माणूस म्हणून जगायचे अजुन काही दिवस. संवेदना,भावना,अस्तित्व,विश्वास,प्रेम अशा शब्दांचा संबंध नसणार , चाहूल नसणार.
फक्त अजुन काही दिवस,सगळ काही साक्षी बनून बघायच. आपल्यातल्या माणसाला रोज सरणावर जाताना हसत हसत बघायच,अजुन काही दिवस.
खरच बरे होईल, किती हलके हलके वाटेल आणि वाटायालाच हव. माणूस म्हणून जगण्याचे ओझ कमी होणार. आयुष्यभर जोपासून ठेवलेल्या मूल्यांच ओझ कमी होणार.
हलक होऊन, पक्षी बनून माझ्या आभाळात उडायच, उंच उंच. होय माझ आभाळ. तुमच-आमच वाटणार चंद्र,तारे नक्षत्र असणार आभाळ तुमचे.. फक्त तुमचे.
माझ आभाळ वेगळ, फक्त माझ्यासाठी..
-----विपुल

Thursday, February 4, 2010

थकलोय ...

लोकांच्या स्वार्थाला बघून थकलोय
देवाला जाब मागून थकलोय

चौकटीतले आयुष्य जगून थकलोय
खोट खोट हसुन थकलोय

पाठमोरी सुखे बघून थकलोय
वेदेनाला कवटाळून थकलोय

दिशाहीन वाटेवर चालून थकलोय
उन्हात सावलीचा पाठलाग करून थकलोय

होकारची वाट बघून थकलोय
नकारातल्या रीतेपणाला थकलोय

स्वप्नांना तुटताना बघून थकलोय
आसवांना पापण्यांशी थोपवून थकलोय

निरअर्थक श्वास घेऊन थकलोय
पंचतत्वात समर्पीत व्हायची वाट बघून थकलोय.
------- विपुल.

Tuesday, February 2, 2010

माणूस

एकटेच आलो, एकटेच जायचे.
ना कोणासाठी थांबायाचे.
श्वास घेत राहायचे, दिवस ढकलत जायचे,
पुन्हा ना कधी माणूस व्हायचे...
हे पाप पुढच्या जन्मात न करायचे
---विपुल

Thursday, January 21, 2010

अशीच तू - तशीच तू

अशीच तू
तशीच तू

हर्ष तू
स्मित तू

चंद्र तू
नक्षत्र तू

शिंप तू
मोती तू

फूल तू
गंध तू

हृदय तू
स्पंदन तू

शब्द तू
काव्य तू

गीत तू
संगीत तू

स्पर्श तू
संवेदना तू

आशा तू
आकांशा तू

आभास तू
अस्तित्व तू

प्राण तू
श्वास तू

अशीच तू
तशीच तू
---विपुल

Thursday, November 5, 2009

अधांतरी....

आयुष्याच्या चित्रपटाला रीवाइंड बटन असते तर किती बरे झाले असते.ज्या गोष्टी चुकल्या त्यांचे पुन्हा रीटेक द्यायचे आणि सगळे कसे व्यवस्थित करायचे.
होईल का असे.....
पुन्हा मागे जाउन तिला सांगायचे मी तुझ्यावर जिवापाड प्रेम करतो.. खरच ह्या गोष्टी तेव्हाच रीयलाइज़्ड झाल्या असत्या तर किती बरे झाले असते.
पण त्या शिवाय प्रेम म्हणजे काय असते हे ही कळले नसते. मानवी स्वभाव पण त्याला कारणीभूत आहे.
एखादी गोष्ट नसल्यावर आपल्याला तिचे महत्व कळते.कित्येक दिवस बंद असलेले दार नकळत कोणी उघडतेआणि त्याची जाणीव होते ती व्यक्ती दूर गेल्यावर… खरच अजब, पण सत्य आहे.
विरह काय असतो आणि आपण खरच कोणावर ईतके प्रेम करतो हे जाणून घेण्यात पण एक वेगळीच नशा असते. किंबहुना आपल्याला माहीत पण नसते आपले हे निष्ठूर मन कोणावर प्रेम करू शकते.कोणीतरी म्हटले आहे प्रत्येक गोष्ट आयुष्यात पहिल्यांदाच होते.पण दोष नक्की कुणाचा ? वेड्या मनाचा, ज्याला प्रेम ह्यालाच म्हणतात हेच माहीत नव्हते, कि बुद्धीचा,ज्याला आपल्या भावना म्हणजे एक भ्रम आहे. "प्रेम" असे काही नसते,असे म्हणून वेड्या मनाला दडपून टाकणारी.
ह्या प्रश्नाचे उत्तर अजुन सुद्धा उनुत्तरित... मनबुद्धीच्या द्वन्द्वामध्ये "मी" मात्र राहतो अधांतरी....शेवटी दोष कोणाचाही असो त्रास "मी“ ला सहन करावा लागतो . भ्रमनिरास झालेल्या बुद्धीला पटते की मन खरे बोलत होते..हेच प्रेम आहे...पण जरी बुद्धीला आणि मनाला पटले तरी दैव थोडी बदलणार आहे. गेलीली वेळ थोडीच येणार आहे... आत्ता "मी“ ने काय करायचे ? पुन्हा तेच रीवाइंड बटन वगैरे वगैरे म्हणून स्वतःची समजूत घालायची आणि गपगुमान पडायच.
---विपुल

Wednesday, September 16, 2009

च्या मारी काहीतरी ईशेष हाय

आज कालच्याला काय व्हतय कळतच नाय
निसतीच कुस बदलत हाय
च्या मारी काहीतरी ईशेष हाय ||

कामात ध्यान नाय,
आन् पोटा-पाणीची सुद नाय
च्या मारी काहीतरी ईशेष हाय ||

बा बोलला दिवट्याच टाळक ठिकाणावर नाय
माय म्हणाली काहीतरी भानगड हाय
च्या मारी काहीतरी ईशेष हाय ||


चान्दुबा बघून काहीतरी व्हत हाय
पावसात मन थुई थुई नाचत हाय
च्या मारी काहीतरी ईशेष हाय ||

आय चान खर सांगू काय
तिच्या याद बिगर राहवतच नाय
जळि स्थळी काष्टी पाषाणि तीच ती हाय
च्या मारी काहीतरी ईशेष हाय ||

----विपुल

Monday, September 7, 2009

तू.........

तू एक सुंदर चाफेकळी
तुला पाहता पडते खळी || १ ||

तू एक सुंदर नाजूक परी
जीव जडला तुझ्यावरी || २||

तू एक सुंदर फुलपाखरू
भोवती तुझ्या मन बावरू ||३||

तू एक रिमझिम रेशीम धारा
आसमन्त सजला सारा ||४||

तू एक सुरेल सुमधुर गाणे
मनात बहरती प्रीतीचे चांदणे ||५||

प्रीतीच्या चांदण्यात चल न्हाऊ या
मनातले गुज बोलु या ||६||

----------विपुल