Thursday, November 5, 2009

अधांतरी....

आयुष्याच्या चित्रपटाला रीवाइंड बटन असते तर किती बरे झाले असते.ज्या गोष्टी चुकल्या त्यांचे पुन्हा रीटेक द्यायचे आणि सगळे कसे व्यवस्थित करायचे.
होईल का असे.....
पुन्हा मागे जाउन तिला सांगायचे मी तुझ्यावर जिवापाड प्रेम करतो.. खरच ह्या गोष्टी तेव्हाच रीयलाइज़्ड झाल्या असत्या तर किती बरे झाले असते.
पण त्या शिवाय प्रेम म्हणजे काय असते हे ही कळले नसते. मानवी स्वभाव पण त्याला कारणीभूत आहे.
एखादी गोष्ट नसल्यावर आपल्याला तिचे महत्व कळते.कित्येक दिवस बंद असलेले दार नकळत कोणी उघडतेआणि त्याची जाणीव होते ती व्यक्ती दूर गेल्यावर… खरच अजब, पण सत्य आहे.
विरह काय असतो आणि आपण खरच कोणावर ईतके प्रेम करतो हे जाणून घेण्यात पण एक वेगळीच नशा असते. किंबहुना आपल्याला माहीत पण नसते आपले हे निष्ठूर मन कोणावर प्रेम करू शकते.कोणीतरी म्हटले आहे प्रत्येक गोष्ट आयुष्यात पहिल्यांदाच होते.पण दोष नक्की कुणाचा ? वेड्या मनाचा, ज्याला प्रेम ह्यालाच म्हणतात हेच माहीत नव्हते, कि बुद्धीचा,ज्याला आपल्या भावना म्हणजे एक भ्रम आहे. "प्रेम" असे काही नसते,असे म्हणून वेड्या मनाला दडपून टाकणारी.
ह्या प्रश्नाचे उत्तर अजुन सुद्धा उनुत्तरित... मनबुद्धीच्या द्वन्द्वामध्ये "मी" मात्र राहतो अधांतरी....शेवटी दोष कोणाचाही असो त्रास "मी“ ला सहन करावा लागतो . भ्रमनिरास झालेल्या बुद्धीला पटते की मन खरे बोलत होते..हेच प्रेम आहे...पण जरी बुद्धीला आणि मनाला पटले तरी दैव थोडी बदलणार आहे. गेलीली वेळ थोडीच येणार आहे... आत्ता "मी“ ने काय करायचे ? पुन्हा तेच रीवाइंड बटन वगैरे वगैरे म्हणून स्वतःची समजूत घालायची आणि गपगुमान पडायच.
---विपुल

No comments: