Friday, December 12, 2008

ती

कॉलेजच्या द्वितीय वर्षी असताना मी तिला सर्वप्रथम बघितले आणि त्या दिवसापासून ते कौलेज संपेपर्यन्त आम्ही भेटतच गेलो.तिची मला इतकी सवय झाली होती की ती नसेल किंवा चुकुन आमची गाठ झाली नसेल तर तो दिवस मला फार वाईट जायचा , इतकी जवळची आणि महत्वाची होती ती माझ्यासाठी.तिला भेटण्यासाठी मी फार धरपड करायचो. कॉलेजला जाताना रोज सकाळी ९.३० वाजता स्वारगेट च्या बस स्टॉप तिची माझी गाठ पडायची... आणि तेथून पुढे आम्ही एकत्र कॉलेजला जायचो.जवळपास आम्ही रोज भेटायचो ( शनिवार व रविवार सोडून ). शनिवारी आम्ही क्वचित भेटायचो त्याचे असे की शनिवारी माझे कौलेज सकाळी ( पहाटे ) ८ वाजता कॉलेज असायचे ( शाळा म्हणले तरीही चालेल .. ) मी जायचोच नाही कॉलेजला कारण तिच्या पेक्षा आणि अभ्यासापेक्षा मला झोप प्रिय होती (अजुन ही आहे...) . रविवार सुट्टी चा दिवस तिचा पण आणि माझा पण...कॉलेज मध्ये असताना आम्ही रोज एकत्र यायचो.. तिच्या बदल जिव्हाळा वाटायचा. आता जवळपास दीड वर्ष झाले तिची माझी गाठ नाही तिची फार आठवण येते पण असो.... माझ्याकडे तिच्या बरोबर च्या सुखद- दुखद आठ वणी चा बहुमुल्य ठेवा आहे. तिने माझी कॉलेजात असताना फार मदद केली. तिच्या कडून मला खूप काही मिळाले त्याबद्दल मे तिचा कायम ऋणी असेल.. अजुन सुद्धा कधीतरी
ती मला दिसते पण आम्ही आता भेटत नाही.. ती मला विसरली असेल पण मी तिला कधीही विसरू शकणार नाही.अरे हो , अजुन मी तुम्हाला तिचे नाव सांगितले नाही ती आहे " शनिवारवाडा ते सिंहगड PMT "

No comments: