Saturday, December 6, 2008

कळसुबाई ट्रेक / Kalsubai Trek




नवरात्री चे दिवस होते 1 ,2 ,3 ओक्टॉबर , सलग सुट्ट्या आल्या होत्या (दुग्ध शर्करा योग ) आम्ही ट्रेकिंग चा प्लान केला. कळसुबाई ला जायचे फार दिवस चालले होते ( जवळ पास एक वर्ष हर्ष चे तून तूने वाजत होते ) शेवटी मुहर्त लागला. सगळे जमून आले , शुक्र , शनि आणि रवि जायचे ठरले. पण सगळे ठरल्या प्रमाणे झाले तर तो प्लान कसला. शेवटी माशी शिंकाली साग्याला शुक्रवार ची सुट्टी नाही मिळाली , त्याचे असे की 2 दिवसात ट्रेक करायला काही हरकत न्हवति पण आमचा अतुल ("The अतुल" ) , त्याला कसे सगळे शिस्त बद्ध आणि सोयीस्कर हवे असते, त्याचा आग्रह होता की 2 दिवसात ट्रेक शक्य नाही ( Nothing is Impossible ! नेओपोलियन गेला चुलित ... अतुल च्या मते ) (वाढलेले वजन पाहता आणि पोटा भोवती वाढलेले टायर बघून) त्या मुळे आम्ही शुक्र वार सकाळी निघायची घाई करत होतो पण साग्या आणि साग्या चे PM महाशय (असो..). आता प्लान कॅन्सल होण्याच्या बेतावर होता पण अचानक कुणाच्या तरी सुपीक डोक्या मधून शक्कल लढवली गेली (शेवटी इंजिनियरिंग केल्याचा काही तरी फायदा नको का ) ,प्लान जरासा Modified झाला , शुक्रवारी साग्याला सकाळी 7 वाजता आफिस ला ट्रेकिंग ची बॅग घेऊन जायचे ठरले आणि बरोबर दुपारी 4.30 वाजता साग्या , हर्ष , मी , गणेश नाशिक फाट्या वर जमायचे आणि तेथून प्रवास चालू करायचा....

संध्याकाळचे 5.30 वाजले होते (4.30 pm IST) सगळे नाशिक फाट्या वर जमले. चहा-पाणी होईपर्यंत 6 झाले आणि शेवटी मोठ्या प्लॅनिंग नंतर आमची
यात्रा चालू झाली...

मी , हर्ष , सागर , गणेश आणि "The अतुल" असे आम्ही ( हम पांच ...)
चला प्रतयेकाची थोडक्यात ओळख करून देतो..



हर्ष :- मूर्ती लहान पण किर्ती महान ( ट्रेकिंग मधला मीहिती आणि तंत्रज्ञान मंत्री )
सागर :- गरीबान चा शिवाजी,,, (to be allocated )
गणेश :- त्याचा आयुष्या मधला पहिला ट्रेक आणि इंजिनियरिंग मेकॅनिक्स मधे Phd (Moral Support & करमवणूक मंत्री )
The अतुल :- आमचे छोटे सर (exam काळात माझ्यासारख्या गरिबांचा कैवारि) (दळणवळण आणि सूचना मंत्री )
मी(विपुल): स्वत:: चे कौतुक करा येत नाही मला ( अर्थमंत्री )
मी आणि गण्या CBZ वर , सागर आणि हर्ष Passion वर , "The अतुल" त्याच्या बाइक वर (एकटा जीव सदाशीव)


पुणे नाशिक हाइवे ने वारी निघाली ... रात्री चे 9.30 वाजले "The अतुल" ने गाडी अचानक थांबवली ... मला वाटले नैसर्गिक विधी साठी असेल कदाचित... पण नाही तसे काही नव्हते मला आणि गणेश ला काही कळेना .. हर्ष आणि साग्या यांचे जेट फार पुढे गेले होते त्याना मी call करून पुन्हा मागे फिरायला सांगितले..
सगळे लक्ष "The अतुल" कडे .. त्याने बॅग मधून एक पिशवी काढली.. तिथे शेजारी एक 5 मिनिटाच्या अंतरवर भैरवनाथचे मंदिर होते , देवाचे दर्शना साठी तो थांबला कितीही अफ़ाट भक्ती.. खरच आमचे भाग्य आहे की "The अतुल" आम्हाला मित्र मानतो.. "The अतुल" आणि सागर देवा चे दर्शन घेऊन आले ...

पुन्हा प्रवास चालू झाला ...
मधे काही वेल रस्त्या मधे एवढे खड्डे होती की मला पुण्यात ले रस्ते आठवले.. फरक एवढाचा की रस्त्यावर शुक-शुकाट होता.. आणि तेवढ्यात आम्हाला आश्चर्याचा धक्का बसला... भर रात्री रस्त्यावरून एक मिरवणूक चालली होती ... गाणी एकदम ... जाउ देत नको काही बोलायला शेवटी प्रत्येकाची आवडत असते.

रात्री "The अतुल" च्या मामच्या घरी (संगमनेरला) मुक्काम करायचा होता.
10.30 pm एका ढाब्या वर आम्ही जेवणा साठी थांबलो ... यथेच्छा ताव मारला सगळ्यानी... एके एकाने काय हादडलय म्हणून सांगू !

तेथून जवळच अतुल चा मामा चे घर होते .. सगळी कडे काळोख होता ( MSEB च्या कृपेने ) .. एकदाचे पोहचलो आम्ही मुक्कामा च्या ठिकाणी... ते एक टिपिकल खेड्यातील टुमदार कौलरू घर होते , एवढे मोठे आंगण मी पहिल्यांदाचा बघत होतो . अंगणात 3-4 बैलांची आर्मी होती आणि 2 रणगाडे (बैलगाडी) होते. आम्ही आमचे घोडे (बाइक्स) गोठा मधे लावले.
कमालीची शांतता होती तिथे ( थोड्या प्रमाणात रात किड्यांचे कर्ण मधुर संगीत चालू होते ) सगळा गाव झोपी गेला होता... मला तर अंगणात च पडी घेउशि वाटत होती .. आभाळ कडे बघत..
अतुल चे मामा आणि आम्ही सारे गप्पा मारत बसलो .. त्याचे मामा खूप चांगल्या स्वभावाचे होते.. खूप मन मिळवू , काही क्षणात मला असे वाटले की मी ह्याना फार आधी पासून ओळखत आहे.. गप्पा मारताना प्रवसाने आलेला सगळा क्षीण गेला...

पहाटे 7.30 वाजता कोंबड्यानी आम्हाला उठवले .. प्रात:: विधी उरकून आम्ही 9.30 वाजता कळसुबाई शिखरा कडे प्रस्तान केले... सह्ययाद्री च्या सर्वोच्चा शिखराचे आम्हाला वेध लागले होते...
वारी दुपारी 12 वाजता कळसुबाई च्या पायथ्याला पोहचली...
समोर कळसुबाई शिखर आम्हाला खुणावत होते ... भिमाकाय पहाड आमच्या कडे क्षुद्र प्राण्या सारखे पाहत खद्खदुन हसत होते ..
आणि पोहचत चा क्षणी माझा हिरमोड झाला... इंजिनियरिंग ला अड्मिशन घेतल्या पासून मागे लागलेली साडेसाती अजुन समपलेली नव्हती असे वाटले.
कळसुबाई ट्रेक चा मास्टर प्लान आम्हला पण नवरात्री मधे करायचा होता.. प्रचंड गर्दी होती..... जिकडे तिकडे देवी च्या दर्शना साठी आले ले भाविक..

मला तर वाटले एथुन कलटी मारावी गर्दी म्हटले की मला जाम चीड चीड होते... मी कधी कल्पना पण केली नव्हती की एवढ्या वर दर्शनासाठी एवढी गर्दी असेल.. पण देवाच्या श्रद्धे च्या उंची समोर सह्याद्री ची उंची असो किंवा हिमालयाची सगळे थेगन वाटते.
सागर म्हणत होतो कळसुबाई चे शिखर गेले उडत आपण रतन गड चा ट्रेक करू पण आम्ही बोल बच्चन टाकल्यावर तो शांत बसला.
मी तर भली मोठी ट्रेकिंग ची बॅग घेऊन आलो होतो त्यात भरपूर साहित्या होते खाण्या पिण्याचे.. मी आता पर्यंत भरपूर ट्रेक केले पण एवढी मोठी बॅग आणि साहित्या कधीच बरोबर घेतले न्हवते. पण नंतर असे कळले की नवरात्री मुळे खाण्याचे हाल होणार नाहीत म्हणून आम्ही तिथेच एका गावकर्‍यच्या घरी अनावश्यक समान ठेऊन चढाईला सुरवात केली..
सुरवाती ची 30 मिनिट मी सगळ्या च्या पुढे होतो पण दुपारचा 12.00 चा आग ओकणारा सुर्या आणि वाढलेली चरबी ह्या दोंघा नि मिळून माझी ट्रेक साठी 8 दिवस केलीली तयारी मातीत घालवली ,माझा वेग कमी कमी होता मी धूस झालो..
मला तर वाटले बस कलटी मारवी गेले उडत ट्रेकिंग.. एथेच झोप काढावी मस्त पैकी ...
मी बाकी च्या ना म्हणालो तुम्ही पुढे जा मी येतो मागून (जमले तर ) ते 'हो' म्हणाले त्याना पण वाटले विपुल आता काही येता नाही...


मागे राहियचे कारण असे की माझ्या कडे एक बॅग होती बर्‍यापैकी जड होती.. आणि ती बॅग गणेश आणि मी आल्टून पालटून घेयाचे ठरले होते , सध्या ती गणेश कडे चा होती आणि थोड्या वेळात माझा नंबर येणार होता.. आणि जर ती बॅग माझ्या कडे आली असती तर कळसुबाई शिखर माझे स्वप्न चा राहीले असते.. त्याच्या पेक्षा भयानक म्हणजे मी मधून कलती मारल्यावर माझी जी हटाई झाली असते त्याची तर मला कल्पना पण करवत नाही ह्या पब्लिक ने पेपरात छापयला पण कमी केले नसते.
माझी फार दमछाक झाली होती उन्हाचा मला फार त्रास होता होता.. शरीरातून नुसतात्या गरम वाफ येता होती..
माझ्या कडे पाणी पण साधे नव्हते :( .. पहिल्यांदाचा ट्रेक मधे माझी एवढी वाईट हालात झाली होती.. मी नेहमी सोबत ग्लुकोन-D घेयचो Dehaydration होऊ नये म्हणून आता तर साधे पाणी पण नव्हते....
एक मन म्हणत होते चल कलटी मारू तर दुसरे एवढ्या दूर फक्त कळसुबाई ट्रेक करायला आलो आहे आणि मधून सोडून जायचे ? आता पर्यंत केलेले कष्टा सगळे वाया जातील...
शेवटी मराठी वृत्ती चा विजय झाला मी तसा च जमेल असा चढत राहिलो शेवटी मला एक लिंबाचा रसवाला भेटला . आणि मी सुटकेचा श्वास घेतला...
रस पिताना अमृत पिल्या सारखे वाटत होते... (मित्र ग्लुकोन-D पित पित ट्रेक करत असतील असो...) माझ्या जीवात जीव आला आणि नव्या जोमाने मी ट्रेक चालू केला ... वाटेत मी एकाला ( वाटाड्याला ) विचारलेअजुन किती बाकी आहे ( मला वाटत होते संपत दर्शना असेल.. ) त्याने उत्तर दिले आता पर्यंत फ्कता 25% आला आहात .. बस देव माझी अग्नी परीक्षा चा घेत होता... एवढे वर येऊन सुद्धा फक्त 25%..


दुपार चे 2 वाजले होते फक्त 25% अंतर कापले होते... मी विचार केला संध्या काळाचे 5.30-6 का वाजेना आपण वर जायचे चा .. सह्याद्रीच्यए शिखर पादन्क्रित करायचे.. सुर्या ची उष्णता कमी झाली होती मी जरा नॉर्मल आलो होतो माझा वेग वाढला होता ... आणि बघतो तर काय मी माझ्या मित्रा ना गाठले होते... मी विश्रांती साठी थांबलो त्याना मी म्हणालो तुम्ही पुढे जा.. सागर माझ्या बरोबर च होता ... तो तर खूप दमला होता,,, पण मला आनंद झाला चला माझ्या सोबत कोणी तरी आहे....
माझा आणि सागर चा प्रवास चालू झाला... जवळपास आम्ही ढगान मधे होतो.. फार मस्त वाटत होते.. वातानुकुलित वातावरण होते.. स्वच्छ हवा..


आमच्या कडे कॅमरा पण नव्हता , चीड चीड.. सगळेकाही हर्षया कडे .. जाउदे गेले तेल लावत... नाही तरी फोटो काढायचा माझा मूड नहवाता (कधी नव्हेते )

शेवटी अथक प्रयत्‍न केल्यावर आम्ही कळसुबाई च्या टॉप वर होतो.. 60-70 फुट चा जागा असेल वर फिरण्या सारखे काही नव्हते .. फक्त देवीचे मंदिर आणि थोडी ची मोकळी जागा.... पण मला फार आनंद झाला .. सह्याद्री पर्वत रांगेतील सर्वोच्च जागी उभे असल्याचा अभिमान वाटत होता. एक वेगळेच समाधान वाटत होते.. लहानपणी जेव्हा भूगोलात कळसुबाई बद्दल वाचले तेव्हा कधी स्वप्नात पण वाटले नव्हते की कधी काळी मी तिथे पाउल ठेवेल...
शेवटी मनाने घेतलेल्या भरारी समोर कळसुबाई शिखर छोटेसे वाटत होते.




जाण्याचा मार्ग :

पुणे -> नाशिक रास्ता -> आळे फाटा -> संगमनेर -> भंडार दारा -> बारी ( base of kalsubai)

2 comments:

Unknown said...
This comment has been removed by the author.
Kaleidoscope said...

We friends are planning for Kalsubai trek this weekend. Can you please send your email id/contact number?
We want to know few details about it. There is no information available on net.
My email id is- gpawar@gmail.com
Thanks in advance.

Ganesh Pawar